झाड एक ;पण भिन्न प्रकारची ४० फळे !

sam
अमेरिकेतील सॅम वान अँकन नावाच्या एका शिल्पकाराने अदभुत झाडे विकसित केली आहेत. या झाडांचे वैशिष्ट म्हणजे त्यांना एकाच वेळी ४0 प्रकारची फळे लागतात. र्जदाळू, मनुका, पिच व चेरीच्या विविध प्रजाती फळे त्यावर उगवली जाऊ शकतात. न्यूयॉर्क, न्यूजर्सीसह अमेरिकेतील विविध शहरांमध्ये त्याने अशी १६ चमत्कारी झाडे लावली आहेत. चिप गेफ्टिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने सॅमने ही झाडे विकसित केली आहेत. या सगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या फांद्यावर भिन्न प्रकारची फळे येतात. पूर्ण वाढ झालेल्या अशा झाडावर विविध प्रकारच्या कळ्या अणि कलम केली जाऊ शकतात. अमेरिकेमध्ये या झाडांचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव होत आहे. जवळपास वर्षभर हे झाड एखाद्या सामान्य झाडासारखे वाटते, पण वसंत ऋतूचे आगमन होताच, त्यांची रंगत बदलू लागते. त्यांचे बहुआयामी रूप या काळात खुलून येते. सायकस विद्यापीठात काम करणार्‍या सॅम वानने झाडांच्या विविध प्रजातींवर प्रयोग करत ही अनोखी कलाकृती तयार केली आहे. २00८पासून तो आपल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत होता. भविष्यात लोकांच्या अन्नाची गरज कशाप्रकारे भागवली जाऊ शकते, हे लोकांच्या दाखवून देण्याच्या उद्देशाने त्याने ही खास झाडे विकसित केली आहेत.

Leave a Comment