गर्भवती महिलांसाठी आले ग्लो नर्चर अॅप

glow
युक्रेनमधील वैज्ञानिक आणि पेपल चे संस्थापक मॅक्स लेवचिन यांनी गर्भवती महिलांच्य मदतीसाठी एक अॅप तयार केले आहे. हे अॅप महिलांना प्रसूतीपूर्व टिप्स आणि सल्ला देऊ शकणार आहे. त्याचबरोबर या काळातले आपले अनुभव दुसर्‍या गर्भवतीशी शेअर करण्याची संधीही देणार आहे. ग्लो नर्चर असे या अॅपचे नामकरण केले गेले आहे.

अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन केलेले हे अॅप गर्भवतींना काय खावे यासारख्या मूलभूत प्रश्नांबरोबर अन्य प्रश्नांची उत्तरे देईल. या अॅपमुळे गर्भवतीला डिलिव्हरी डेट समजेल तसेच दररोज गर्भात बाळाची वाढ कशी होते आहे याची माहितीही देईल. गर्भवती या अॅपच्या सहाय्याने त्यांची वैयक्तीक लक्षणे नोंद करू शकतील. या सिंपटम्सची तुलना हे अॅप अन्य गर्भवती महिलांच्या सिपटम्सबरोबर करेल आणि कांही महत्त्वाची माहिती लक्षात आली तर युजरला डॉक्टरची भेट घेण्याची सूचनाही देईल. मोबाईलवर हे अॅप वापरता येणार असल्याने गर्भवती कधीही आणि कुठेही त्याचा सहज वापर करू शकणार आहेत.

Leave a Comment