अतिक्रमणे … कुंभमेळाच रद्द करण्याचा पवित्रा

kumbh-mela
नाशिक – नाशिकच्या कुंभमेळा परिसरातील अतिक्रमण तातडीने न हटविल्यास कुंभमेळा रद्द रद्द करण्याचा पवित्रा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांनी घेतला आहे .

नाशिकमध्ये जानेवारी 2015 साली सिंहस्थ कुंभमेळा आहे. त्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेच्या महंतांचं नाशिकमध्ये आगमन झाले . त्यावेळी त्यांनी कुंभमेळाच्या तयारीची पाहणी केली.मात्र ज्या परिसरात कुंभमेळा असतो. तिथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.यापूर्वी जेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा झाला होता. त्यावेळी दीडशे महंत होते. आता 700 महंत आहेत. त्यामुळे यंदा गेल्यावेळी पेक्षा जास्त जागा लागणार आहे. मात्र कुंभमेळ्याच्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.हे अतिक्रमण हटवा अशा सूचना महंतांनी केल्या आहेत. अन्यथा कुंभमेळा रद्द करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.दरम्यान, अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेनं आदेश दिल्याची सारवासारव महापौर यतीन वाघ यांनी केली आहे.

Leave a Comment