राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा; बोल्टची रेस शनिवारी

bolt
ग्लासगो – राष्ट्रकुलमध्ये रविवारपासून अ‍ॅथलेटिक्स प्रकारांना सुरूवात झाली असून मात्र आणखी आठ दिवस करावी लागणार आहेत ते जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्टला पाहण्याची. कारण बोल्ट राष्ट्रकुलमध्ये ४ बाय १०० या सांघिक प्रकारात सहभागी होणार आहे आणि ती रेस २ ऑगस्टला आहे. ऑलिंपिक चॅँपियन बोल्ट प्रथमच राष्ट्रकुलमध्ये सहभागी झाला आहे. बोल्टच्या रेसला वेळ असला तरी तो ग्लासगोमध्ये त्याच्या जमैकाच्या सहकारी धावपटूंचे मनोबल वाढवण्यासाठी हजर झाला आहे.

भारत २०१०ची पुनरावृत्ती करेल की नाही ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भारताने मागील राष्ट्रकुल स्पर्धेत घरच्या प्रेक्षकांसमोर १२ पदके (दोन सुवर्ण) जिंकली होती. मात्र यंदा सरावाचा अभाव ही भारताच्या अ‍ॅथलिटची चिंता आहे. थाळीफेकपटू कृष्णा पूनिया, सीमा अंटील, धावपटू अश्विनी अक्कुंजी यांनाच परदेशात जास्त खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय गोळाफेकपटू ओमप्रकाश सिंग क-हाना, थाळीफेकपटू विकास गौडाकडूनही पदकाची आशा आहे. मात्र हे तिघे वगळल्यास भारताच्या एकूण ३२ जणांच्या अ‍ॅथलेटिक्स चमूची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Comment