बेकू चषक; स्विटोलिना विजेती

elena
बेकू – युक्रेनच्या इलेना स्विटोलिनाने अझरबेजानमध्ये झालेल्या बेकू चषक महिलांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सर्बियाच्या जोव्हानोव्हेस्कीचा अंतिम सामन्यात स्विटोलिनाने 6-1, 7-6 (7-2) असा पराभव केला.

या लढतीतील पहिला सेट 22 मिनिटांत जिंकताना द्वितीय मानांकित स्विटोलिनाने दोनवेळा जोव्हानोव्हेस्कीची सर्व्हिस तोडली पण बोजाना जोव्हानोव्हेस्कीने दुसऱया सेटमध्ये कडवी लढत देत हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबविला. 2012 साली जोव्हानोव्हेस्कीने ही स्पर्धा जिंकली होती.

Leave a Comment