बीसीसीआयची जडेजाला दंडित केल्यानंतर भूमिका योग्यच

jadeja
साउथम्प्टन – रवींद्र जडेजावर अँडरसनसोबत वाद झाल्यानंतर लावण्यात आलेल्या दंडामुळे बीसीसीआय नाराज होणे योग्यच आहे. फक्त निर्णयच नव्हेतर याचे टायमिंगवरही प्रश्नचिन्ह आहे. याविरुद्ध मंडळाने अधिकृतरीत्या विरोध दर्शविला तर ते चुकीचे ठरणार नाही. हा वाद अधिक चिघळला तर आपल्या खेळाडूंचे लक्ष्य मालिका जिंकण्यापासून भटकू शकेल, यासाठी काळजी आवश्यक आहे.

या प्रकरणी अँडरसनने जडेजाला शिवीगाळ केली, असा पहिला आरोप भारताने लावला. प्रत्युत्तरात इंग्लंडने जडेजावर हेच आरोप लावले. जडेजावर लावण्यात आलेल्या आरोपांची सुनावणी डेव्हिड बुन यांनी केली. त्यांनी जडेजा, अँडरसन आणि त्यांच्या वकिलांची बाजू ऐकली. यानंतर त्यांनी जडेजावर लावण्यात आलेल्या लेवल 2 च्या आरोपांना लेवल 1 मध्ये बदलले. नंतर त्यांनी सामनेनिधीतून 50 टक्के रक्कम कपातीचा दंड लावला.

बीसीसीआयची नाराजी योग्य आहे. भारताने प्रथम तक्रार केली. त्याप्रकरणी अद्याप कसलाच निर्णय झालेला नाही. मात्र, भारताच्या तक्रारीविरोधात लावण्यात आलेल्या आरोपांची सुनावणी आणि निर्णय झाला. आयसीसीचे नियम अत्यंत स्पष्ट आहेत. खेळ आणि खिलाडूवृत्तीला नुकसान होईल असा कोणताही व्यवहार, वागणूक शिक्षेला पात्र आहे. यात शब्दांपासून ते इशार्‍यांचाही समावेश आहे.

Leave a Comment