पोलिसांच्या अमानवीय कृतीची चौकशी करा : विनोद तावडे

vinod
मुंबई : कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील येळ्ळूरमधील मराठी भाषिकांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करावी आणि दोषींविरोधी कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केंद्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. के.जी. बालकृष्णन यांच्याकडे केली आहे.

रविवारी येळ्ळूरमध्ये मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. कर्नाटक पोलिसांच्या या कृत्याची चौकशी व्हावी, अशी मागणी तायडे यांनी बालकृष्णन यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. कर्नाटक पोलिसांनी असे कृत्य केल्याने मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे. त्यांनी सगळे नियम आणि कायदे पायदळी तुडवले आहे. यातील पिडीत मराठी भाषिक सध्या उपचार घेत आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याचे तावडे यांनी बालकृष्णन यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील ‘महाराष्ट्र राज्य-येळ्ळूर’ चा फलक रविवारी कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला. त्यावेळी याला प्रतिकार करणाऱयांना त्यांनी अमानुष लाठीमार केल्याने हा वाद चिघळला आहे.

Leave a Comment