आता फेरीवाल्यांना मिळणार २० वर्षाचा परवाना

hawkers
मुंबई – मुंबईमध्ये सध्या फेरीवाल्यांच्या नोंदणीवरून जरी वाद उठलेला असला तरी प्रत्यक्षात नोंदणी करणा-या फेरीवाल्यांना केवळ २० वर्षाकरताचा व्यवसाय करण्याचा परवाना दिला जाणार असून या फेरीवाल्यांचा नोंदणीचा प्रथम कालावधी १० वर्षाचा असेल आणि त्यानंतर केवळ एकदाच १० वर्षाकरताच पुनर्नोदणी केली जाईल. त्यामुळे २० वर्षाच्या कालावधीनंतर फेरीवाल्यांना आपले नोंदणीपत्र महापालिकेस परत करणे बंधनकारक राहणार आहे. हे नोंदणीपत्र ताब्यात घेतल्यानंतर ते इतर गरीब व गरजू अर्जदाराला दिले जाणार आहे.

मुंबईतील फेरीवाल्यांचे सव्‍‌र्हे आणि नोंदणीचे काम सध्या सुरू असून पहिल्या टप्प्यातील नियमित फेरीचा व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांचा सव्‍‌र्हे पूर्ण झाला आहे. आता दुस-या टप्प्यात २८ जुलैपर्यंत आठवडा बाजारात फेरीचा व्यवसाय करणा-यांचा सव्‍‌र्हे पूर्ण केला जाणार आहे.

Leave a Comment