अमानुष मारहाण, मोदी सरकार गप्पच ;राज ठाकरे

raj
मुंबई – महाराष्ट्र सदनावरून शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला साथ देण्यापेक्षा नामानिराळी राहणाऱ्या भाजपला आता मनसेने टार्गेट केले आहे, येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेनंतर केंद्र सरकार गप्पच आहे,अशी टीका राज ठाकरे यांनी करून अप्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. शिवाय हेच महाराष्ट्रात परप्रांतीयांबाबत झाले असते तर?, असा सवाल केला.

राज ठाकरे म्हणाले,महाराष्ट्रात जर परप्रांतीयांना कुणी मारहाण केली असती, तर देशात प्रचंड गोंधळ झाला असता. येळ्ळूरमधील प्रकार हा निषधार्हच आहे पण मराठी नागरिकांवर अन्याय झाला तर आता कोणीच का बोलत नाही? असा सवालही राज यांनी केला. अशा प्रकरणांमध्ये भाजपचे नेते केवळ पत्रकं काढतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही फार गंभीर नाहीत, असेही राज म्हणाले. तसेच महाराष्ट्राने शिवसेना-भाजपचे एवढे खासदार निवडून दिले आहेत. आता मला बघायचेच आहे, की सीमाप्रश्न सुटतो का? असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे.

Leave a Comment