विजयासाठी आफ्रिकन संघाला 331 धावांची गरज

south
कोलंबो – श्रीलंकन संघाला येथे सुरू असलेल्या दुस-या कसोटीत यजमान विजयाची संधी असून काल खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 331 धावांची जरुरी असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत. दुस-या डावात दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 38 धावा जमविल्या.

दक्षिण आफ्रिकेने या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून श्रीलंकेवर आघाडी मिळविली असल्याने लंकेला बरोबरी साधण्याची संधी या दुस-या कसोटीत लाभली आहे. लंकेने पहिल्या डावात 421 धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 282 धावांत आटोपल्याने लंकेने 139 धावांची आघाडी मिळविली. लंकेने बिनबाद 11 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि 53.4 षटकांत 8 बाद 229 धावांवर डावाची घोषणा करून दक्षिण आफ्रिकेला 369 धावांचे कठीण आव्हान दिले.

लंकेच्या दुस-या डावात संगकारा आणि कर्णधार मॅथ्यूज यांनी शानदार अर्धशतके झळकविली. संगकाराने 90 चेंडूंत 8 चौकारांसह 72 तर मॅथ्यूजने 83 चेंडूंत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 63 धावा जमविल्या. सलामीच्या थरंगाने 4 चौकारांसह 30 तर सिल्वाने 5 चौकारांसह 26 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे मॉर्नी मॉर्कलने 45 धावांत 4 तसेच स्टीन आणि ताहीर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. चहापानानंतर कर्णधार मॅथ्यूजचे अर्धशतक फलकावर लागले आणि लंकेने दुसऱया डावाची घोषणा केली.

Leave a Comment