राष्ट्रकुल स्पर्धा : ओतारीला वेटलिफ्टिंगचे कांस्य!

otari
ग्लास्गो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये 69 किलोग्रॅम गटात ओंकार ओतारीने कांस्य जिंकत भारताला दिवसातील 6 वे पदक जिंकून दिले. स्पर्धेच्या तिस-या दिवशी तो यशस्वी ठरला. ओतारीने एकूण 269 किलोग्रॅम वजन उचलत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.

या गटात 305 किलोग्रॅम वजन उचलत मोहम्मद हफिफी मन्सूरने सुवर्णपदक जिंकले तर 302 किलोग्रॅम वजनासह रौप्यपदकावर नायजेरियाच्या यिंका अयेनुवाने मोहोर उमटवली. क्लाईड ऑडिटोरियममध्ये संपन्न झालेल्या या इव्हेंटमध्ये 26 वर्षीय ओतारीने भारताचे 17 वे पदक नोंदवले.

Leave a Comment