आगामी विधानसभा निवडणुकांत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने तयार करण्यात आलेली महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट सध्या सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मनसेच्या स्थापनेच्या वेळीच महाराष्ट्राची विकास ब्ल्यू प्रिंट प्रसिद्ध करण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आत्तापर्यंत ही ब्ल्यू प्रिंट गोषातच होती. आता मात्र राज यांच्या फोटोसह ही ब्ल्यू प्रिंट फेसबुकवर लोड केली गेली आहे.
मनसेची महाराष्ट्र ब्ल्यूप्रिंट सोशल मिडीयावर
मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी ही ब्ल्यू प्रिंट तयार केली असल्याचे सांगितले जांत आहे. शिदोरे यांनी त्यासाठी ९ हजार कागदपत्रे अभ्यासली असल्याचेही सांगितले जात आहे. राज्यातील विविध प्रश्न म्हणजे रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार हेच मुद्दे या ब्ल्यू प्रिंटमध्ये आहेत. या मुद्यांवरच आजपर्यत विविध राजकीय पक्षांनी निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे मनसेच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये नवीन काय असा सवाल जाणकार करत आहेत. मनसेची बहूचर्चित विकास ब्ल्यूप्रिंट हीच असेल तर मनसेला सत्तेत येण्याचे कोणतेही चान्सेस नाहीत असे मत राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.