तिस-या कसोटीत भक्कम स्थितीत इंग्लंड

ballance
साउथम्प्टन – इंग्लंडने भारताविरुद्धच्या तिस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन गड्यांच्या बदल्यात २४७ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडला मात्र सलामीवीर सॅम रॉबसनला २६ धावांवर बाद करुन पहिला धक्का दिला. मोहम्मद शामीने रवींद्र जडेजाकडे झेल देऊन त्याला तंबूत पाठवले.

मोहम्मद शामीने रॉबसनला (२६) बाद करत भारताला यश मिळवून दिले तरी कुक आणि यजमानांच्या वर्चस्वाला अष्टपैलू रवींद्र जडेजा कारणीभूत ठरला. त्याने नवोदित मध्यमगती पंकज सिंगच्या गोलंदाजीवर कुकला स्लिपमध्ये जीवदान दिले. त्यावेळी तो १५ धावांवर खेळत होता.

कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक आणि गॅरी बॅलन्स यांनी फटकेबाजी करत इंग्लंडला चहापानापर्यंत १ बाद १८९ अशी मजल गाठून दिली. १५ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत कुकने गेल्या काही कसोटींतील अपयश भरून काढले. १० डावांनंतर त्याला पहिले अर्धशतक झळकवण्यात यश आले. बॅलन्सनेही अर्धशतकासह फॉर्म दाखवला.

रवींद्र जडेजाने फॉर्मात असलेल्या कुकला महेंद्रसिंह ढोणीकडे झेल देऊन बाद केले. कुने ९५ धावा केल्या. त्यानंतर आलेला ग्रे बालन्स (नाबाद १०४) आणि इआन बेल (नाबाद १६) धावांवर खेळत आहेत.

Leave a Comment