टूर डी फ्रान्स : निबाली विजेता

nibali
पॅरिस – इटलीच्या व्हिन्सेन्झो निबालीने टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धेत आपले सर्वंकष विजेतेपद निश्चित केले असून येथे निबालीला विजेतेपदाचा बहुमान शेवटच्या टप्प्यानंतर दिला जाणार आहे. शनिवारी 20 व्या टप्प्यात निबाली चौथ्या स्थानावर राहिला. बर्जरॅकपासून सुरू झालेला 54 कि. मी. चा 20 वा टप्पा टोनी मार्टिनने जिंकला.

जर्मनीच्या मार्टिनने हा टप्पा निबालीपेक्षा दोन मिनिटांचा कालावधी कमी नोंदवित जिंकला. मार्टिनने एक तास, 6 मिनिटे आणि 21 सेकंदाचा अवधी घेतला. निबालीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 7 मिनिटे 52 सेकंदांनी सर्वंकश आघाडी मिळविल्याने त्याचे जेतेपद निश्चित झाले आहे. सर्वंकश विभागात जिन क्रिस्टोप पेरॉने दुसरे तर पिनॉटने तिसरे स्थान मिळविले. आंतरराष्ट्रीय टूर डी सायकलिंग क्षेत्रात तीन ग्रँड टूर्स जिंकणारा निबाली हा सहावा सायकलस्वार आहे. 1998 नंतर निबाली हा इटलीचा पहिला स्पर्धक टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धा जिंकणारा ठरला आहे. यापूर्वी इटलीच्या दिवंगत पँटिनीने 1998 साली ही स्पर्धा जिंकली होती. निबालीने 2010 ची टूर ऑफ स्पेन तर गेल्या वर्षी गिरोड इटालिया सायकलिंग स्पर्धा जिंकली होती.

Leave a Comment