ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद रेड बुलला

red
डापेस्ट – हंगेरीयन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद रेड बुलचा ड्रायव्हर डॅनियल रिकार्डोने येथे पटकावले. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने पिटलेनमधून सुरुवात करून आश्चर्यकारक कामगिरी करीत तिसरे तर फेरारीच्या फर्नांडो अलोन्सोने दुसरे स्थान मिळविले.

पोल पोझिशनवरून मर्सिडीजच्या निको रॉसबर्गने सुरुवात केली. पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे हॅमिल्टनवरील त्याची आघाडी 14 वरून 11 गुणांवर आली आहे. रिकार्डोचे या मोसमातील हे दुसरे जेतेपद आहे. या शर्यतीवेळी मॅक्लारेनच्या गाडीतून दुसऱयाच वळणावर धूर येऊ लागला तर कॅटरहॅमच्या मार्कस एरिकसनची गाडी तिसऱया वळणावर क्रॅश झाली. याशिवाय लोटसच्या रोमेन ग्रोस्जाँची गाडी 11 व्या लॅपवेळी तर फोर्स इंडियाच्या सर्जिओ पेरेझची गाडी 23 व्या लॅपवेळी क्रॅश झाली.

Leave a Comment