नवी दिल्ली : दीर्घ काळापासून उच्च गतीच्या मोबाईल इंटरनेट सेवा देण्याचा दावा दूरसंचार कंपन्याकरीत आल्या आहेत. मात्र, आता ग्राहकांना कमीत कमी ८० टक्के वेळा दाव्यानुसार २३ ऑगस्टपर्यंत किमान डाऊनलोड गतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.हा नियम २जी व ३जी सेवांसाठी लागू आहे.
आता सुपरफास्ट होणार मोबाईल इंटरनेट
गुणवत्ता मानकांमध्ये ट्रायने वायरलेस डेटा सेवा नियमनासाठी सुधारणा केली आहे. यानुसार, ग्राहकांना दिलेले प्रत्येक सेवा दात्यास मोबाईल व डोंगल दोन्ही पद्धतीने दिल्या जाणाऱ्या इंटरनेट योजनांमध्ये उपलब्ध किमान डाऊनलोड स्पीडबाबत आश्वासन पूर्ण करावे लागणार आहे. मे २०१४ च्या अखेरीपर्यंत देशात ५ कोटी ग्राहक मोबाईल आणि डोंगलद्वारे वायरलेस इंटरनेट सुविधा वापर होते.
दूरसंचार कंपन्यांना ट्रायला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याद्वारे सर्वाधिक तीव्र गतीच्या ३ जी सेवेमध्ये किमान डाऊनलोड स्पीड ३९९ केबीपीएस ते २.४८ एमबीपीएस यादरम्यान आहे.