सीमावासियांना कायद्याच्या चौकटीत राहूनच मदत : उपमुख्यमंत्री

ajit
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बेळगावातील मराठी भाषिकांना कायद्याच्या चौकटीत राहूनच मदत करण्याचे आश्वासन यांनी दिले.

कानडी पोलिसांनी येळळूर येथे ‘महाराष्ट्र राज्य येळळूर’ नावाचा फलक काढण्यास विरोध केल्यामुळे मराठी भाषिक सीमाबांधवांना अमानुष मारहाण केली. यात वृध्द, महिला व बालकांना अक्षरशः झोडपून काढण्यात आले. राक्षसी प्रवृत्तीच्या पोलिसांनी गुंडगिरी करीत सीमाबांधवांच्या घरादारांवर दगडफेक करीत अनेक घरांचे व वाहनांचे नुकसान केले. कानडी पोलिसांच्या गुंडगिरीचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, सीमाबांधवांना कायद्याच्या चौकटीत राहुनच मदत करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Leave a Comment