कलेच्या माहेरघराला पूर्णवेळ शिक्षक देणार : राजेश टोपे

rajesh
मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची सरकारने अखेर दखल घेतली आहे. सोमवारपासून महाविद्यालयात पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले आहे. शिक्षक रूजू होईपर्यंत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत.

जे.जे.स्कूलमध्ये अल्पाइड आर्ट आणि फाईन आर्ट अशा दोन शाखा आहेत. यात दहा कायमस्वरूपी शिक्षक आणि 11 कंत्राटी शिक्षक आहेत. कंत्राटी शिक्षकांची मुदत 30 मार्चला संपली असून तेव्हापासून या शाखेत शिक्षकच नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. पूर्णवेळ शिक्षक मिळावेत यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

Leave a Comment