सोनिया गांधी घेणार जागा वाटपावर अंतिम निर्णय : शरद पवार

sharad-pawar
मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचे अंतिम निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीतील नेत्यांशी काँग्रेससोबत निवडणूक लढविण्याबाबत पवार यांनी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. स्वतंत्रपणे निवडणूक लढविणे, हे दोन्ही पक्षांच्या हिताचे नाही. तसेच दोन्ही पक्षातील संबधाला तडा जाईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Comment