विधानसभा लढणार नव्हे ,लढविणार; राखी

rakhi
औरंगाबाद- मी विधानसभा निवडणूक लढणार नाही तर लढविणार आहे,असे रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष राखी सावंत यांनी स्पष्ट केले आहे . शिवाय पंतप्रधान मोदी यांनी रामदास आठवले यांना लवकरात लवकर केंद्रात मंत्री करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे .

रिपाइंच्या विभागीय मेळाव्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. राज्यातील महिलांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यासह गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. गृहमंत्री असलेल्या पाटील यांना ‘एनसी’ आणि ‘एफआयआर’ यातील फरकही माहिती नाही, असा टोला राखी सावंत यांनी लगावला. गृहमंत्र्यांना पुन्हा भेटणार असून, निवेदनावर त्यांनी काय कार्यवाही केली, याची माहिती घेणार आहे. वेळेप्रसंगी बेमुदत उषोषणही करेन, असा इशारा राखीने दिला आहे .

Leave a Comment