मुंबई: मुंबई पोलिसांना धमकीचे पत्र मिळाल्याने मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या ‘रडार’वर असल्याची भीती वर्तवली जात आहे. मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे.
धमकीचे पत्र ;दहशतवाद्यांच्या ‘रडार’वर पुन्हा मुंबई
एक पानाचे हे पत्र असून ते इंग्लिश आणि हिंदीत आहेत. पोलिस आयुक्त राकेश मारियांच्या नावे हे पत्र आले आहे. “1993च्या वेळी तुम्ही नशिबवान ठरलात, हिम्मत असेल तर आता थांबवून दाखवा”, असा मजकूर या पत्रात आहे.गाझामध्ये झालेल्या हत्यांचा बदला घेण्यासाठी हे धमकीचे पत्र पाठवले आहे. ‘राकेश मारिया 1993च्या बॉम्बस्फोटात वाचले पण आताच्या हल्ल्यात ते वाचू शकणार नाहीत,’ असेही पत्रात लिहिले आहे.या पत्रानंतर मुंबईत सर्वत्र पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. तसंच या धमकीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.