हत्येच्या तपशील द्या, अन्यथा अंनिसचे राज्यभर आंदोलन

hamid
पुणे : डॉ. दाभोलकरांच्या हत्येला वर्ष होत आले, तरी तपासात अद्याप स्पष्टता नाही. तसेच हत्येच्या तपासाचा 10 दिवसांत तपशिल सरकारने द्यावा, अन्यथा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन छेडतील असा इशारा हमीद दाभोलकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्टला वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अद्याप तपासात कुठलीही प्रगती दिसत नाही. अद्याप पोलिसाच्या हाती ठोस असे काहीही नाही. त्यातच पत्रकार आशिष खेतान यांनी स्टिंगद्वारे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची पोलखोल केल्याने तपासाला वेगळेच वळण लागले आहे. पोळ यांनी हत्येच्या तपासासाठी प्लँचेटचा वापर केल्याचे या स्टिंगच्यामाध्यमातून समोर आल्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्लँचेट प्रकरणाचा तपास अतिरिक्त महासंचालकांच्या अखत्यारित केला जाणार असल्याचे सांगितले असले तरी अंनिस यावर समाधानी नसल्याचे दिसते. कुठल्याही प्रश्नाला पाटील यांचे ‘तपास सुरु आहे’ हे एकेव उत्तर असते. मात्र, तपासात कुठलिही प्रगती नसते. 20 ऑगस्टला राज्यभरातील प्रत्येक जिल्हय़ात अंनिसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन शांततेत निषेध मोर्चा काढणार असल्याचे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

Leave a Comment