वेस्ट इंडिजचा भारत दौरा, सामन्याची ठिकाणे निश्चित

bcci
नवी दिल्ली – भारतात नोव्हेंबरमध्ये होणा-या वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ठिकाण निश्चित केले असून ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान होणा-या या दौ-यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका, पाच सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका आणि एक टी-२० सामना होणार आहे.

तीन कसोटी सामने बंगळूरू, अहमदाबाद आणि हैदराबाद या ठिकाणी होतील. तर एकदिवसीय सामने कोलकाता, विशाखापट्टणम, कटक, धर्मशाला आणि कोट्टा या ठिकाणी होतील. तर दौ-यातील एकमेव टी-२० सामना दिल्लीतील फिरोझ शहा कोटला मैदानावर होईल. कोटला मैदानावरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होणार आहे.

आठ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिज दौ-यारा सुरुवात होईल. दोन्ही संघादरम्यान प्रथम पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. २१ ऑक्टोबर रोजी टी-२० सामना होईल. त्यानंतर कसोटी सामने होतील, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्याच वर्षी भारत दौ-यावर वेस्ट इंडिजचा संघ आला होता. त्यावेळी तेंडुलकरने अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

Leave a Comment