राणेंना हवे प्रदेशाध्यक्षपद

rahul
दिल्ली – उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देऊनही काँग्रेसमध्येच राहिलेल्या नारायण राणे यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना प्रदेशाध्यक्षपद अथवा महसूल सारखे मलईदार खाते दिले जावे तरच राजीनामा मागे घेईन असे सांगितले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राणे सध्या दिल्ली मुक्कामीच असून आता ते सोनिया गांधींच्या भेटीची प्रतीक्षा करत आहेत.

राजीमामा नाट्यानंतर राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. तेथे त्यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर प्रथम फोनवरून व नंतर प्रत्यक्ष बोलणे करून आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडले तेव्हा राहुल यांनी त्याबाबत सोनियांशी भेट घालून देण्याचे कबुल केले आहे. राहुल यांच्या भेटीत राणे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कार्यशैलीबाबत खूपच नाराजी व्यक्त केली आणि प्रदेशाध्यक्षपद द्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांत पुन्हा सत्तेत आणतो असा विश्वास व्यक्त केला होता.

कॉग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार राणे यांचे म्हणणे फक्त एकून घेतले जाईल. राज्यात निवडणुका तोंडावर आल्याने पदांत नव्याने कोणतेही बदल शक्य नसल्याचे व त्यामुळे राणे यांची मागणी पूर्ण होण्याची अजिबात शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment