मोदी व्हिसा प्रकरणी ओबामा अंधारात?

obama_modi
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेने घातलेल्या व्हिसाबंदी संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एप्रिलपर्यंत कांही माहितीच नव्हती. या प्रकरणाबाबत ते पूर्णपणे अंधारात होते अशी माहिती पुढे आली आहे. भारतीय अमेरिकन कॉन्स्टीट्यूशनलच्या एका अमेरिकन लॉ मेकरने ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मोदींना व्हीसा नाकारल्याचे प्रकरण तेव्हाच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लींटन व त्यांच्या जागी आलेले सध्याचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांना पूर्ण कल्पना होती मात्र प्रत्यक्ष अध्यक्षांपर्यंत त्याची माहिती दिली गेली नव्हती. मात्र ओबामांच्या अध्यक्षपदासाठीच्या प्रचारमोहिमांसाठी भारतीय अमेरिकन फंड रेझर नी २ एप्रिलला ओबामांची भेट घेतली तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शिकागो येथे दुपारी दोन वाजता ही बैठक झाली होती. या भेटीत भारतात मोदी पंतप्रधान बनण्याची शक्यता खूपच दाट असल्याचे त्यांना सांगितले गेले आणि भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोदींवरील व्हीसा बंदीबाबत निर्णय घेतला पाहिजे.तेव्हा ओबामांनी त्या संदर्भात कांही माहिती नसल्याचे सांगितले होते असेही समजते.

व्हीसा बंदीमुळे भारताबरोबरच्या संबंधात कडवटपणा येऊ शकतो हे लक्षात आल्याने ओबामा यांनी भारतातील निवडणुका पार पडताच मोदींना फोन करून शुभेच्छा देऊ आणि अमेरिका भेटीचे निमंत्रण देऊ मात्र आत्ताच फोन करायला नको अन्यथा मी निवडणुकांत ढवळाढवळ करतो आहे असे चित्र निर्माण होईल असेही सांगितले होते. मात्र यामुळे व्हाईटहाऊस आणि स्टेट डिपार्टमेंटमधील संबंध किती ढिसाळ आहेत हे दिसून आले होते असेही या लॉमेकरचे म्हणणे आहे. मोदी व्हिसाबंदीचा विषय अध्यक्ष आणि त्यांच्या विश्वासू अधिकार्‍यांपर्यंत पोहोचलाच नव्हता असे लक्षात आल्यावर ओबामांनी या संदर्भात हा निर्णय योग्य नसल्याचेही कबुल केले होते.

Leave a Comment