
औरंगाबाद – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनी चांगलेच फैलावर घेतले. आज काँग्रेसचा मराठवाडा विभागीय संकल्प मेळावा औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात राज्यसभा खासदार रजनी यांना बोलू न दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
महिला खासदाराने मुख्यमंत्र्यांना घेतले फैलावर
तुम्ही एका स्त्रीमुळेच मुख्यमंत्री पदी म्हणून आहात, याची आठवण ठेवा असे खडे बोल खासदार रजनी पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुनावले आहेत. मेळाव्यात मानपमान नाट्य व्यासपीठावर घडले आहे.
खासदार राजनी पाटील यांना भाषण न करून दिल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तक्रारी नंतरच मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाषण करण्यास सांगितले. त्यावेळी खासदार पाटील यांनी ज्या पक्षात ५० टक्क्यांची भाषा केली जाते त्याच पक्षात महिलांना दडपले जाते असा आरोपही केला आहे.
या संकल्प मेळाव्याला महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, तसेच मुख्यमंत्र्यासह प्रदेशाध्यक्ष यांची उपस्थिती होती. विधानसभेच्या तयारीसाठी आज मराठवाड्यात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
