पुन्हा दिमाखाने उभा राहिला ‘महाराष्ट्र राज्य’ येळ्ळूर फलक

boder1
बेळगाव – जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी मराठी भाषिकांचा मानबिंदू असलेला आणि साराबंदी चळवळीचा साक्षीदार असलेल्या येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य’ येळ्ळूर हा फलक उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगत पोलीस संरक्षणात हटविला होता. हे दुःख येळ्ळूर ग्रामस्थांसह सीमावासीयांच्या मनात खदखदत होता. यामुळे येळ्ळूर वासीयांनी आज दुपारी 1 वाजता हा फलक पुन्हा उभा केला. येळ्ळूर वासीयांच्या मराठी अस्मितेमुळे हा फलक आता पुन्हा दिमाखाने उभा राहिला आहे.

महापालिका कार्यालयावरील भगवा ध्वजामुळे कन्नड भाषिकांच्या पोटात पोटशूळ उठला होता. उच्च न्यायालयात हा भगवा ध्वज हटविण्यासाठी जनहित याचिका दाखल करुन आपल्याला हवा तसा निकाल करुन हा ध्वज हटविण्याचे कटकारस्थान करण्यात आले. पण शहराच्या मध्यभागी असलेल्या कार्यालयावरील ध्वज हटविल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका होता. यामुळे नवी इमारत बांधून या प्रकरणामधून पळ वाट काढण्यात आली. पण याच धर्तीवर येळ्ळूर येथील फलक हटविण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक कन्नडाभिमान्यांच्या डोळ्यात खुपत असल्यानेच हे काढण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आले. याला जिल्हा प्रशासनाने साथ दिली. यामुळेच शुक्रवारी हा फलक काढणे शक्य झाले. हा फलक हटविण्याची सुचना जिल्हा प्रशासनाला दिली होती. हा फलक काढण्यासाठी शुक्रवारी सकाळी संपूर्ण पोलीस फौजफाटय़ासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येळ्ळूर येथे दाखल झाले. नागरिकांना कळण्यापूर्वी फलकावर हातोडा मारला.

Leave a Comment