‘टीसीएस’जगातील दुसरी मोठी आयटी कंपनी

tata1
मुंबई : सॉफ्टवेअर निर्यात आणि आऊटसोर्सिंग करणारी टाटा समुहातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस कंपनी आता जगातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी ठरली आहे. या आठवड्यातच टीसीएस कंपनीचे बाजारमूल्य ५ लाख कोटींच्या पार गेले आहे. यामुळे बाजारमूल्याच्या तुलनेत टीसीएस भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. याआधी आयबीएम या आयटी कंपनीने ५ लाख कोटींचे बाजारमूल्य पार केले होते. सध्या आयबीएमचे बाजारमूल्य १९३.७ अब्ज डॉलर आहे, तर टीसीएसचे बाजारमूल्य ८४ अब्ज डॉलर आहे. टीसीएस कंपनीचे बाजारमूल्य टाटा समुहातील कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यापैकी ७५ टक्के बाजारमूल्य असलेली कंपनीदेखील ठरली आहे.

Leave a Comment