गूढ … पण जुनाट कारचे ‘कब्रस्थान ‘

gudh
दक्षिण बेल्जियमच्या एका जंगलात अनेक वर्षांपासून एकाच उभ्या असलेल्या गाड्यांचा एक गूढ ताफा आहे. या कार कुणी व कशासाठी इथे ठेवल्या आहेत, याबाबत कुणालाच खात्रीशीर माहिती नाही. लग्जमबर्ग प्रांतात या कार असलेले चॅटीलोन नावाचे ठिकाण आज कारचे स्मशान म्हणूनच ओळखले जाते. असे सांगतात की, सुमारे ७0 वर्षांपूर्वी या जंगलातून जाणार्‍या रस्त्यावर वाहनांची मोठी कोंडी झाली असावी, मात्र त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसल्याने लोक आपल्या कार इथेच सोडून गेले असावे. दुसरीकडे असेही समजले जाते की, दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकी सैनिक घरी लवकर परतण्याच्या आनंदात आपल्या कार या भागात दडवून गेले होते. हे ठिकाण काहीसे उंचावर आहे. त्यामुळेच बहुधा त्यांना ही जागा त्यासाठी योग्य वाटली असावी. अर्थात स्थानिक लोक ते मानण्यास तयार नाही. त्यांच्या मते ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून जुनाट गाड्यांचा अड्डा राहिली आहे. एखादी कार जुनी झाल्यानंतर तिचा मालक इथे येऊन ती सोडून जातो. चॅटीलोनमध्ये कारची अशी कब्रस्ताने आहे, तिथे गेल्या काही वर्षांत ५00हून जास्त जुन्या कार ठेवलेल्या आहेत. अर्थात काही कार आसपासचे लोक घेऊन गेले आहेत वा त्यांचे काही भाग काढून घेतले आहेत. २0१0मध्ये या जुनाट कार पर्यावरणासाठी धोका असल्याची ओरड सुरू झाल्यानंतर प्रशासनाने काही कार रस्त्यावरून हटवत अन्यत्र नेऊन नष्ट केल्या.

Leave a Comment