इस्त्रायलचा गाझापट्टीवर अर्ध्या दिवसाचा संघर्षविराम

gaza
येरुसलेम : आज आंतरराष्ट्रीय वेळेनुसार मानवी गरजांसाठी इस्त्रायली सैन्याकडून अर्ध्या दिवसाच्या संघर्षविरामाची घोषणा करण्यात आले. इस्त्रायली सैन्य संघर्षविरामाचे पालन पहाटे 5 वाजेपासून करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सैन्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गाझावासियांना प्रदेश सोडून जाण्याचे युद्धाच्या सुरूवातीला सांगण्यात आले होते. त्यांच्या परतण्याला मनाई करण्यात आली आहे. तसेच हमासच्या लोकांनी रॉकेट हमला केला तर सैन्य त्याला त्यांच्या भाषेत उत्तर देईल. गाझापट्टीत नियंत्रणाखाली असणाऱया प्रदेशातील बनवलेल्या सुरुंगांना नष्ट करण्याचे काम सुरु ठेवले जाईल, असे इस्त्रायली सैन्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान, हमास आणि गाझाच्या दुसऱया समुहाने मानवीय आधारावर जारी करण्यात आलेल्या संघर्ष विरामावर राष्ट्रीय सहमती दर्शविली आहे.

Leave a Comment