राज्यात सहा महिन्यात ९०९ लाचखोर जेरबंद

lach
नागपूर : शासकीय कोणतेही काम असो ,सरकारी काम चार दिवस थांब हा कारभार अजूनही हद्दपार झालेला नाही . त्यात तत्काळ काम करून घ्यावयाचे असेल तर ‘टेबलाखालून’चा व्यवहार प्रचलित झाला आहे मात्र त्या कारभाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना होत आहेत. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांनी जानेवारी २0१४ पासून आतापर्यंत राज्यभरातील तब्बल ९0९ लाचखोरांना जेरबंद केले आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारा पोलीस विभाग भ्रष्टाचाराच्या अशा प्रकरणांमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ जानेवारी ते १५ जुलै २0१४ या कालावधीत तब्बल १५५ लाच प्रकरणे प्राप्त झाली. त्या खालोखाल महसूल विभागाचा नंबर असून या विभागाची १५२ प्रकरणे प्राप्त झाली आहेत. याचप्रमाणे भूमिअभिलेख विभागाची २१, वीज वितरण कंपनी कार्यालयातील २४, महानगरपालिकांशी संबंधित ३३, जि. प. शी संबंधित ३१, पं. स.शी संबंधित ३६, आरोग्य विभागाशी संबंधित २३, शिक्षण विभागाशी संबंधित २४ अशा जवळपास ४0 विभागांतील तब्बल ६३९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Leave a Comment