लासगो(स्कॉटलंड)- प्रकाश नांजप्पाने भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तिस-या दिवशी पदक मिळवून दिले. १० मी एअर पिस्तुल प्रकारात त्याने रौप्य पदक मिळवले. या पदकासह स्पर्धेतील भारताच्या पदकांची संख्या ११ झाली आहे. यात तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. तर पदक तालिकेत भारत पाचव्या स्थानावर आहे.
भारताची आणखी एक पदकाची कमाई
इंग्लंडने १२ सुवर्ण पदकांसह पहिले तर त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाने तितक्यात पदकांसह दुसरे आणि स्कॉटलंडने सात सुवर्ण पदकांसह तिस-या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर कॅनडा असून त्यांच्या खात्यात सात सुवर्ण पदके आहेत.