नेपाळ संसदेला संबोधित करणार “नमो”

modi
काठमांडू : ऑगस्टच्या 3 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळच्या दौ-यावर जात असून या दौ-यावेळी ते नेपाळच्या संसदेला संबोधित करतील. नेपाळचे परराष्ट्रमंत्री महेंद्र पांडेय यांनी अतिप्राचिन प्रसिद्ध प्रशुपतीनाथ मंदीरात ते पूजापाठदेखील करणार असल्याची माहिती दिली.

3 आणि 4 ऑगस्टला नेपाळाचा दोन दिवसीय दौरा पंतप्रधान मोदी करणार आहेत. भारतीय पंतप्रधानांचा हा 1997 पासून पहिला नेपाळ दौरा असून नेपाळ सध्या आपले नवे संविधान लिहीत आहे. 2006 ला नेपाळमध्ये राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाहीची स्थापना झाली. या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.

पंतप्रधान सुशिल कोईराला यांच्या निमंत्रणावरून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱयावर येत आहेत. यावेळी ते संविधान सभेला संबोधित करतील. 1997 ला माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, 2002 ला अटलबिहारी वाजपेयी यांच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळचा दौरा करीत आहेत.

Leave a Comment