दुचाकी चोरीपासून वाचवेल सेन्सर किल्ली

killi
दुचाकींच्या चोर्‍यांत झालेल्या वाढीमुळे अनेक मोटरसायकल कंपन्यांनी सेन्सरकिल्ली या नव्या फिचरसह गाड्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. अर्थात जुन्या मोटरसायकल व स्कूटरसाठीही अशा किल्लया बसविता येणार आहेत. यामुळे दुचाकी मालकांना वाहन चोरीस जाण्याची भीती राहणार नाही. भविष्यातील दुचाकी या फिचर सह बाजारात येणार आहेत.

सेन्सर किल्ली ही इंजिन आणि आणि लॉक या दोन्हीशीही जोडली गेलेली आहे. यामुळे चोरटे अथवा अन्य दुसरा कोणी गाडीचे लॉक बनावट चावीने उघडू शकणार नाही तसेच गाडीचे इंजिनही सुरू करू शकणार नाही. वायरिंग तोडून गाडी सुरू करणेही शक्य होणार नसल्याने गाडी चोरीची शक्यता एकदमच आटोक्यात येत असल्याचे समजते. ऐन गर्दीच्या ठिकाणी व्हील लॉक लावण्याचे विसरले तरीही गाडी चोरीची भीती राहणार नाही. या किल्लीची किमत २ ते अडीच हजार रूपयांच्या दरम्यान असून वायरिंगसाठी येणारा खर्च १ ते दीड हजार रूपये आहे असे समजते

Leave a Comment