मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्य प्रांतात हत्तीचे तब्बल दहा हजार वर्षांपूर्वीचे अवशेष संशोधकांना सापडले आहेत. हे अवशेष लहान वयाच्या हत्तीचे असावेत, असा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे. हत्तीची कवटी व दाताच्या या अवेशषांची लांबी जवळपास दोन मीटर इतकी असल्याचे संशोधक म्हणाले. तत्कालीन हत्तींपेक्षा हे अवशेष बरेच लहान असल्याने एखाद्या कमी वयाच्या हत्तीचे हे अवशेष असावेत, असे संशोधक म्हणाले.
दहा हजार वर्षापूर्वीचे हत्तीचे अवशेष सापडले
आधुनिक काळातील हत्तींपेक्षा दहा हजार वर्षांपूर्वीच्या हत्तींचा आकार मोठा असल्याचे मेक्सिकोच्या राष्ट्रीय मानवशास्त्र व इतिहास संस्थेने म्हटले आहे. मध्य मेक्सिकोतील एका ज्वालामुखीतून निर्माण झालेल्या खडकात यावर्षीच्या मे महिन्यात हे अवशेष सापडले होते, असे संस्थेच्या अधिकार्याने सांगितले. अवशेष सापडल्यानंतर पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी येथे उत्खननास सुरुवात केली असून, येथे आणखी महत्त्वाचे अवशेष व पुरावे सापडू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.