तेलाचा मोठा खजिना सापडला राजस्थानच्या वाळवंटात !

rajasthan
नवी दिल्ली – तेल आणि नैसर्गिक वायू संशोधन करणारी प्रमुख कंपनी केअर्न इंडियाने राजस्थानच्या थर वाळवंटात तेल अणि गॅसच्या नव्या साठय़ांचा शोध लावला आहे. या कंपनीच्या अंदाजानुसार येथे ७ अब्ज बॅरल तेलाचा साठा आहे. यामुळे भारतातील देशी खनिज तेल क्षेत्राच्या चित्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.केअर्न इंडिया कंपनीचे अध्यक्ष नवीन अग्रवाल यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे तेल आयातदार देश असल्याची माहिती दिली. याच वेळी अमेरिका तेल आयातीच्या प्रमाणात कपात करीत आहे. अशा वेळी सरकारने धोरणे आणि करपद्धती सोपी व सुबोध करून तेल उत्पादनास प्रोत्साहन दिले, तर देशाला तेल आयातीच्या प्रमाणात कपात करणे शक्य होईल. तसेच यामुळे देश तेलाबाबत स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल. देशात उत्पादन होणार्‍या तेलामुळे सरकारला महसूल मिळेलच; पण आयातीवरील खर्चदेखील कमी होईल. केअर्न इंडियाच्या तेल उत्पादनामुळे मागील वर्षी देशाचे ४८ हजार कोटी रुपये वाचले होते. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत राजस्थानमधून दररोज ४.८ कोटी घनफूट गॅसचे उत्पादन होत आहे. वर्षअखेरपर्यंत हे उत्पादन दुप्पट होण्याची शक्यता असल्याची माहिती अग्रवाल यांनी या वेळी दिली.

Leave a Comment