मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर धनसंचय करण्याच्या हेतूने टाटा स्टीलने आपल्या दोन टप्प्यांतील बाँड विक्रीतून १.५ अब्ज डॉलर म्हणजे ९,000 कोटी रुपये जमवले आहेत. टाटा समूहातील कंपनीचा अशा पद्धतीचा हा सर्वात मोठा सौदा आहे.
टाटा स्टीलने जमविले ९००० कोटी !
टाटा स्टीलच्या अर्थ आणि कॉर्पोरेट विभागातील समूह कार्यकारी संचालक कौशिक चटर्जी म्हणाले की, हा टाटा स्टीलचा पहिला अमेरिकी डॉलरचा बाँड निर्गमित करण्यात आला. धनसंचय करण्याच्या हेतूने या समूहाच्या बाँडला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्यात आले. यातून जमणार्या रकमेचा वापर धोरणात्मक पद्धतीने करण्यात येईल. यात परदेशातील गुंतवणुकीचाही समावेश आहे. डॉलरमध्ये मोजण्यात आलेली ही रक्कम कंपनीच्या सिंगापूर येथील एबीजेए इन्वेस्टमेंट्स कंपनीने जमवली असून यापूर्वी कंपनीची मालकीची असणारी सहकारी कंपनी आहे. या कंपनीला उत्पादनात ११ अब्ज डॉलरच्या किमतीच्या बाँडची आर्डर मिळाली होती. दोन भागांत प्रस्तुत करण्यात येणार्या उत्पादनात ५0 कोटी डॉलरचे असुरक्षित (अनस्क्यिोर्ड) बाँड आहेत यावर कूपन दर ४.५ टक्के आहे आणि हा ३१ जानेवारी २0२0 रोजी परिपक्व होईल. तर उर्वरित एक अब्ज डॉलरच्या १0 वर्षांच्या बाँडवर कूपन दर ५.९ टक्के आहे. या उत्पादनाच्या विक्रीसाठी हाँगकाँग, सिंगापूर व लंडनमध्ये सोबतच रोडशो आयोजित करण्यात आले होते.