विधानसभा निवडणूक ; ‘आप’ महाराष्ट्रातून ‘आऊट’ !

aap
मुंबई – लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या आम आदमी पार्टी आता हवेतून जमिनीवर आली आहे. जनमत आपल्याविरोधात असल्याचे त्यांच्या लक्षात तर आले आहे शिवाय पक्षांतर्गत वादही मोठ्याप्रमाणावर असल्याने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लढवायच्या नाहीत असा निर्णय पक्षाच्या राज्य समितीने घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात ‘आप’ला फक्त २.२ टक्के मते मिळाली. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे अवसान गळाले आहे.या सगळ्याचा अंदाज घेऊन निवडणुका लढण्याऐवजी तळागाळातील संघटना बांधणीकडे लक्ष देण्याचे राज्यातील नेत्यांनी ठरवले आहे.
‘आप’च्या हरयाणा युनिटनेही विधानसभा निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र युनिटने हा निर्णय घेतला आहे.निवडणुका न लढविण्याबाबत महाराष्ट्र युनिटच्या सर्व सदस्यांचे एकमत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे,असे ‘आप’च्या महाराष्ट्र संयोजक अंजली दमानिया यांनी सांगितले.दरम्यान हरियाणा येथे होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात निवडणुका लढवायच्या कि नाहीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Leave a Comment