वर्क ऍट होमला बंदी

work
तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यात खूप बदल झालेले आहेत आणि त्यामुळे माणसाचे कष्ट वाचले आहेत. अनेक लोकांची कामे कॉम्प्युटरवर केली जात असतात आणि त्यांच्या कंपनीचे सगळे कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्कनी जोडलेले असतात. असा माणूस आपल्या घरात बसून काम करू शकतो. जपानमध्ये अशी एक पाहणी करण्यात आली की, किती लोकांची कामे घरात बसून होऊ शकतात.

या पाहणीतून असा निष्कर्ष हाती आला की, बर्‍याच लोकांना ऑङ्गिसमध्ये जाण्याची गरज नसते. काही लोकांनी तर केवळ मोबाईल हॅन्डसेटवर आपली कन्सल्टिंग कंपनी चालवलेली आहे. तेव्हा या लोकांनी कुठे तरी ऑङ्गिस घेण्यापेक्षा आपल्या घरात बसून काम केले तर ऑङ्गिससाठी जागा घेण्याचा खर्च वाचेल आणि पेट्रोलची बचत होईल. याहू, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांनी तर आपल्या अनेक अधिकार्‍यांना ऑङ्गिसमध्ये येण्याची गरजच नाही, असे सांगून टाकलेले आहे.

याहूच्या सीईओ म्हणून काम करणार्‍या मेरिसा मायर यांनी मात्र या कंपनीची सूत्रे हाती घेतल्याबरोबर पहिला आदेश काढला तो म्हणजे यापुढे घरी बसून कोणाला काम करता येणार नाही. त्यांच्या या निर्णयामुळे अधिकारीवर्गात खळबळ माजली आहे. घरी बसून कामे करण्याने किती ङ्गायदे होतात हे या अधिकार्‍यांनी मायर यांना पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पद्धतीचा ङ्गायदा विशेषत: महिलांना जास्त होतो. अनेक महिला मुलांकडे लक्ष देऊन, संसारातली आवश्यक कामे करीत करीत कंपनीचे काम करतात. कंपनीत जाण्या-येण्याचा वेळ वाचतो, घरच्या कामाच्या बाबतीतले टेन्शन कमी होते आणि काम चांगल्या प्रकारे करता येते.

काही कुटुंबात वृद्ध आजारी लोक असतात. त्यांची शुश्रुषा करीत काम करता येते इत्यादी इत्यादी. मात्र मेरिसा मायर यांचे म्हणणे वेगळे आहे. ज्या ठिकाणी कंपनीतले लोक समोरासमोर बसून काम करतात त्या ठिकाणचे काम जास्त होते, असा त्यांचा दावा आहे. एकंदरीत सध्या अनेक कंपन्यांमध्ये घरी बसून काम करणे योग्य की ऑङ्गिसमध्ये जाऊन काम करणे योग्य यावर मोठा वाद जारी आहे. भारतातील संवाद तज्ज्ञ अलेक पदमसी, रोहित ठाकूर, चंदा कोरच, नंदिता शहा इत्यादींनी याबाबतीत आपली मते व्यक्त केली असून घरी बसून काम करणेच योग्य असल्याची ग्वाही दिली आहे.

Leave a Comment