भारतीय हॉकी संघाचा वेल्सवर ३-१ ने विजय

glassgow1
ग्लासगो – पहिल्याच दिवशी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सात पदकांची कमाई करणा-या भारताने दुस-या दिवशीही चांगली सुरुवात केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने सलामीच्या सामन्यात वेल्सवर ३-१ ने शानदार विजय मिळवला.

व्ही.आर.रघुनाथने २० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करुन, भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. काही मिनिटांनी अँड्रयू कॉर्निकने गोल झळकवत वेल्सला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

पहिल्या सत्रात वेल्सने चांगली लढत देत भारताला १-१ असे बरोबरीत रोखले. दुस-या सत्रात ६४ व्या मिनिटाला रुपिंदर सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारतासाठी गुरविंदर सिंगने तिसरा गोल झळकवत ३-१ ने विजय सुनिश्चित केला.

दुस-या सत्रात भारताने वेल्सला जास्त संधी मिळणार नाहीत याची खबरदारी घेतली आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली. ऑलिंपिकमध्ये आठवेळा सुवर्णपदक मिळवणा-या भारताला राष्ट्रकुलमध्ये आतापर्यंत एकदाही सुवर्णपदक जिंकता आलेले नाही.

Leave a Comment