चीनमध्ये ‘रम्मासून’ वादळाचे 62 बळी

ramma
बिजिंग : ‘रम्मासून’ या वादळाने चीनमध्ये आतापर्यंत 62 जणांचे बळी घेतले असून, 21 नागरिक बेपत्ता आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘रम्मासून’ हे गेल्या चाळीस वर्षातील सर्वात विनाशकारी वादळ आहे. चीनी अर्थव्यवस्थेचे या वादळाने 6.2 अरब डॉलरचे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि महापूरामुळे चीनमधील 8 लाख 20 हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. यापैकी 2 लाख 61 हजार नागरिकांना युध्दपातळीवर मूलभूत सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे. मुसळधार पावसामुळे 37 हजार घरांचे नुकसान झाले आहे.

Leave a Comment