आयकर कार्यालये शनिवार रविवारी खुली

incometax
नागरिकांना आपली प्राप्तीकर विवरणपत्रे भरता यावीत यासाठी देशभरातील आयकर कार्यालये शनिवार व रविवारीही खुली राहणार असल्याचे आयकर विभागाकडून कळविले गेले आहे. ३१ जुलै ही विवरणपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार नागरिकांच्या सोयीसाठी आयकर कार्यालयातून जादा कौंटर सुरू केले गेले आहेत.यामुळे करदात्यांना वेळेत त्यांची विवरणपत्रे भरणे शक्य होणार आहे. दि.२६ ते २८ जुलै आणि ३०,३१ जूलै रोजी हे कौंटर सुरू राहणार आहेत.२९ जुलैला ईद निमित्त कार्यालये बंद राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि पाच लाखांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना त्यांची विवरणपत्रे कागदी फॉर्मवरही दाखल करता येतील तर ५ लाखांपेक्षा जादा उत्पन्न असलेल्यांना त्यांची विवरणपत्रे ऑनलाईनच भरावी लागणार आहेत.

Leave a Comment