‘आदर्श’ मुख्यमंत्र्यांची उच्च न्यायालयात धाव

ashok-chavan
नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी पेड न्युज प्रकरणी निवडणुक आयोगाने बजावलेल्या नोटीसीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

अशोक चव्हाण यांना महाराष्ट्र विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत पेड न्युज प्रकरणी दोषी ठरवण्यात आल होते. याप्रकरणी निवडणुक आयोगाने चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वीस दिवसात या नोटीसीला चव्हाण यांना उत्तर द्यायचे आहे. दरम्यान, या याचिकेला चव्हाण यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. येत्या आठवडाभरात याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यावरील कारवाईच संकट टळणार का, याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागल आहे.

Leave a Comment