वराह पालन

pig
वराह म्हणजे डुक्कर. खरे तर हा काही नवा व्यवसाय नाही पण शेतकर्‍यांसाठी हा व्यवसाय नवा आहे कारण शेतकरी काही डुकरांचे पालन करीत नाहीत. पण शेतकर्‍यांनी हा व्यवसाय चांगला केला तर त्यांना चांगला ङ्गायदा होऊ शकतो. अशा जोडधंद्यांची माहिती देण्यामागे शेतकरी स्वावलंबी व्हावा आणि शेतीला बसणार्‍या निसर्गाच्या ङ्गटक्यापासून त्याची सुटका व्हावी हा हेतू आहे पण हे धंदे करताना सेंद्रीय शेतीचा दृष्टीकोनही विसरून चालणार नाही. म्हणूनच वराह पालनाचे गणित मांडण्यापूर्वी त्याचे सेंद्रीय गणितही मांडले गेले पाहिजे. डुकराच्या लेंड्या हाही ङ्गार उपयुक्त सेंद्रीय खत आहे. शेतकर्‍यांनी हाफायदा विचारात घेतला पाहिजे. डुकरांचे मूत्र आणि लेंड्या शेतीला ङ्गार उपयुक्त असतात. गाय किंवा म्हैस यांचे शेण शेतात सेंद्रीय खत म्हणून वापरण्याआधी ते कुजवावे लागते. पण डुकराच्या लेंडया कुजवण्याची गरज नसते. त्या तशाच शेतात वापरल्या तरी त्यांचा खत म्हणून चांगला वापर होत असतो.

काही भागात शेतकर्‍यांना या खताचे महत्त्व कळलेले आहे म्हणून तिथे या लेंड्यांना चांगली मागणीही असते आणि डुकरे पाळणारे लोक त्यांचा ङ्गायदा घेऊन या लेंड्या वेगळ्या गोळा करून त्यांची विक्री करतात. काही ठिकाणी शेतकरी या लेंड्या पोत्याला ५० ते ६० रुपये देऊन विकत घेतात. शेतकर्‍यांच्या भाषेत सांगायचे झाले तर डुकराच्या लेंड्या ङ्गार गरम असतात आणि त्या शेतात वापरल्या तर त्या पिकाला पाणी खूप द्यावे लागते. अर्थात पाणी देण्याची सोय करून या लेंड्यांचा वापर केला तर पीकही भरघोस येते असा अनुभव आहे. काही शेतकरी या वाळलेल्या लेंड्या खळ्यात बडवून घेऊन त्याचा भुगा करतात आणि नंतर तो शेतात पसरतात. त्यामुळे तो समप्रमाणात पसरतो आणि त्याचा चांगला ङ्गायदा होतो. डुकराच्या लेंड्या खास करून उसाला वापरण्याची पद्धत आहे.

वराह पालनाच्या पद्धती

वराह पालनामध्ये सुद्धा शेळीप्रमाणे तीन प्रकार अवलंबिले जातात. खुली पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. खुल्या पद्धतीमध्ये वराह म्हणजे डुक्कर साधारणत: दिवसभर मोकाट ङ्गिरत राहतात. परंतु रात्री त्यांना तात्पुरत्या उभ्या करण्यात आलेल्या शेडमध्ये बंद केले जाते. या पद्धतीत खर्च कमी येत असला तरी काही धोके आहेत. या पद्धतीतले वराह घाणीत लोळतात आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्यावर होतात. त्यांच्यामुळे त्यांच्यात रोगराई वाढण्याचीही भीती असते. वास्तविक आजवर या गोष्टीचा विचार केला गेलेला नाही. परंतु अशा प्रकारे पाळलेल्या डुकरांचे मांस खाणार्‍या लोकांना सुद्धा त्यांची बाधा होऊ शकते. दुसरा एक धोका असतो तो स्थानिक जातींमध्ये मिसळण्याचा. म्हणजे आपण प्रगत जातीची डुकरे पाळली असतील आणि त्यांची जात आणि वंंंश याबाबतीत आपण दक्ष असू तर स्थानिक जातीत मिसळल्यामुळे वर्ण संकर होतो आणि आपण पाळलेल्या जातीचे वैशिष्ट्य टिकून रहात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक जातीची आणि आपल्याकडे परंपरागतरित्या पाळली जाणारी डुकरे मोकळ्यावरची हवा सहन करू शकतात. मात्र आपण संकरित किंवा प्रगत जातीची डुकरे पाळली असतील तर ती या हवेला टिकाव धरत नाहीत. डुकरांमध्ये मरतुक मोठ्या प्रमाणावर असते आणि हवेच्या बाबतीत दक्षता घेतली नाही तर ही मरतुक वाढून नुकसान होण्याचा संभव असतो.

डुकर पाळण्याची आणखी एक पद्धत म्हणजे अर्धबंदिस्त पद्धत. या पद्धतीमध्ये डुक्कर उघड्यावर असतात परंतु जाळीच्या कुंपणाच्या आत ती ङ्गिरत असतात. मात्र त्यांना या पद्धतीमध्ये खाद्य आपण द्यावे लागते आणि कुंपणाच्या आतच त्यांच्यासाठी खास खोल्या तयार करून ङ्गिरल्यानंतरची विश्रांतीची सोय करावी लागते. डुकरांच्या आहारामध्ये काही पथ्ये पाळलेली असतात. निरनिराळ्या वयाच्या डुकरांना निरनिराळे खाद्य द्यावी लागते आणि हे कसोशीने करण्यासाठी निरनिराळ्या वयाची डुकरे वेगवेगळ्या ठिकाणी डांबावी लागतात. बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये असे करणे शक्य होते. असे केल्याने वाढत्या वयातील पिलांमध्ये मरण्याचे प्रमाण कमी होते. बंदिस्त पद्धतीमध्ये वराह पूर्णपणे बंदिस्त असतात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या आधुनिक पद्धतीने बांधून द्याव्या लागतात. आधुनिक पद्धतीमध्ये वराह पालन करण्यास खर्चही होतो. परंतु पैदास आणि निरोगीपणा या गोष्टी पूर्णपणे सांभाळता येतात. बंदिस्त पद्धतीत नित्यनेमाने साङ्गसङ्गाई करावी लागते. पाणी रोज बदलावे लागते, खाद्याची भांडी साङ्ग करावी लागतात. या सार्‍या पद्धतींचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

वराह पालन हा व्यवसाय जसा शेतकर्‍यांचा पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो, तसाच तो स्वतंत्र व्यवसाय म्हणून सुद्धा ओळखला जातो. बरेच लोक केवळ वराह पालन करून चांगला ङ्गायदा मिळवत असतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी वराह पालनाकडे अधिक लक्ष दिले तर त्याला स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही ङ्गायदा होतो. आपल्याकडे डुकराचे मांस खाण्याची प्रथा ङ्गारशी नाही. काही लोक तर डुकराला अपवित्र समजत असतात. मात्र भारताच्या ईशान्य भागातील आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालॅन्ड, अरुणाचल, मणिपूर आणि मिझोराम या भागात राहणार्‍या आदिवासी लोकांच्या आहारामध्ये डुकराचे मांस मोठ्या प्रमाणावर समाविष्ट असते. म्हणजे भारताच्या काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात तर ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात डुकराच्या मासांचे मार्केट आहे. ईशान्य भारतातील राज्यातील एकूण लोकसंख्या ङ्गार तर तीन ते साडेतीन कोटी एवढी आहे. म्हणजे भारतातले हे मार्केट ङ्गार मोठे नाही. परंतु चीन, अमेरिका, रशिया, ब्राझील अशा देशांमध्ये डुकरांचे मांस मोठ्या प्रमाणावर भक्षण केले जाते. म्हणजेच डुकराच्या मांसाला परदेशात निर्यातीची चांगली संधी आहे. वराह पालन करणार्‍या शेतकर्‍यांनी ज्या कोणाचे मार्गदर्शन घ्यावयाचे ठरवले असेल त्याच्याकडून मार्केटची निश्‍चित स्वरुपाची माहिती घ्यावी आणि नंतरच या व्यवसायात पडावे. हा व्यवसाय करण्यापूर्वी प्रशिक्षिण घेतलेले कधीही चांगले. मुंबईच्या शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालयात वराह पालनाच्या प्रशिक्षणाची सोय आहे. तिच्याविषयी चौकशी करायला हरकत नाही.
त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गोवर्धन वराह पालन ङ्गार्म यांच्यातर्ङ्गे प्रशिक्षणाची सोय केली जाते. हे प्रशिक्षण पुणे आणि सातार्‍याच्या दरम्यान असलेल्या शिरवळ येथे असते. इच्छुकांनी श्री. गोपाल सुराल, राहणार बेबेडोहळ, तालुका मावळ, जि. पुणे या पत्त्यावर किंवा ९८९०१०४३७५ या ङ्गोन क्रमांकावर संपर्क साधायला हरकत नाही. सकृतदर्शनी तरी वराह पालन हा व्यवसाय अधिक ङ्गायदेशीर ठरावा अशी माहिती हाती आलेली आहे. कारण डुकरांच्या पैदाशीमध्ये अनेक प्रकारचे संंशोधन झाले असून डुकरांच्या निरनिराळ्या ३०० जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. डुकरांमध्ये सुद्धा संकरित जाती तयार झालेल्या आहेत. आठ माद्या आणि एक नर असे एक युनिट गृहित धरले जाते. डुकराचे पिलू साधारणपणे एक वर्ष वयाचे असताना वयात येते आणि वयाच्या पंधराव्या महिन्यात ते प्रजननक्षम होते. त्याचा गर्भारपणाचा काळ चार महिन्यांचा असतो. डुकरांच्या काही जातींमध्ये एका वितात २० ते २२ पिली जन्माला येतात. हा कमाल आकडा आहे. परंतु साधारणत: १० ते १५ पिली जन्मतात. म्हणजे प्रत्येक मादी वर्षातून दोन वित देते. याचा अर्थ कमीत कमी २० ते ३० पिली ती जन्माला घालते. ज्या जातींमध्ये २० ते २२ पिली जन्माला घालण्याची क्षमता असते त्या जातीत तर एक मादी वर्षाला ४० पिली जन्माला घालते. याचा हिशोब केला असता वराह पालन किती ङ्गायदेशीर ठरू शकते याचा अंदाज येईल.