ग्लासगो – भारताच्या अव्वल नेमबाज मलायका गोएलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारातील अंतिम फेरीत रौप्य पदक पटकवले आहे. मात्र या प्रकारात हीना सिध्दूला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारताला एअर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक
यासोबत राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण आठ पदकांची कमाई केली आहे. बॅरी बडडॉन रेंजवर मलायकाने अचूक नेम साधत रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केले. या प्रकारात सिंगापूरच्या शुन झे टीओने १९८ गुणांसह सुवर्णपदक पटकावले तर कॅनडाच्या डी ल्युडविगने १७७.२ गुणांसह कास्यपदक पटकावले आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हीनाने म्युनियच वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते.