भारताची पहिल्या दिवशी सात पदकांची कमाई

glassgow
ग्लॅस्को : भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच वेटलिफ्टींग आणि ज्युदो या क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंनी सात पदकांची कमाई केली आहे.

भारताचे पदकांचे खाते वेटलिफ्टींगमध्ये संजिता चानू आणि मीरा चानू या महिला वेटलिफ्टर्सनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई करीत उघडले. सुरेखा डे हिने त्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर टाकली. मुंबईचा वेटलिफ्टर गणेश माळी याने कांस्य पदक पटकावले.

ज्युदो या क्रीडा प्रकारात भारताच्या खेळाडूंनी दोन रौप्य व एक कांस्य पदकाची कमाई केली आहे. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीमुळे स्पर्धेत भारताने दमदार सुरूवात केली आहे.

Leave a Comment