पॅरापॉवरलिफ्टर सचिन चौधरी उत्तेजक चाचणीत दोषी

glassgow1
ग्लास्गो : भारतीय पथकावर 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत मान खाली घालण्याची वेळ आली. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे पॅरापॉवरलिफ्टर सचिन चौधरीवर हा प्रसंग ओढवला. भारतातील उत्तेजकविरोधी एजन्सी `नाडा’ने महिन्याभरापूर्वी घेतलेल्या चाचणीत त्याने निर्बंधित द्रव्य घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले.

शेवटच्या क्षणी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सचिन चौधरीचा समावेश करण्यात आला होता. वडील आजारी असल्याने तो ग्लास्गोहून मायदेशी परतल्याचे बुधवारी सांगण्यात आले होते. पण नाडाने घेतलेल्या चाचणीत तो दोषी असल्याचे आढळल्यानेच त्याला मायदेशी पाठविण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. `चौधरीने निर्बंधित द्रव्य घेतल्याचे आढळून आले हे खरंय. महिनाभरापूर्वी नाडाने त्याची ही चाचणी घेतली होती. तो दोषी आढळला हे दुर्दैवीच म्हणावे लागेल,’ असे पॅरा स्पोर्ट्स पथकातील एका सदस्याने सांगितले.

Leave a Comment