धुमकेतूच्या पृष्ठभागावर स्थापणार प्रयोगशाळा - Majha Paper

धुमकेतूच्या पृष्ठभागावर स्थापणार प्रयोगशाळा

comet
अंतराळाच्या विशाल दुनियेत प्रथमच धुमकेतूच्या पृष्ठभागावर प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने हा विडा उचलला असून नोव्हेंबरमध्ये हे कार्य पुरे केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रोजिरा अंतराळयानातून फिले नावाची ही प्रयोगशाळा धुमकेतू ६७ पी चिरयुमोव्ह गेरासिमेंको वर स्थापन केली जाईल. या प्रयोगशाळेचे धुमकेतूवरचे लँडींग पाहणे रोमांचकारी असले तरी हे काम मोठेच आव्हानात्मक असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. आजपर्यंत धुमकेतूसंदर्भातली माहिती मिळविण्यासाठी अनेक याने धुमकेतूजवळून गेली आहेत . कांही वेळा याने धुमकेतूला धडकावूनही माहिती गोळा केली गेली आहे. मात्र प्रत्यक्ष धुमकेतूवरच प्रयोगशाळा स्थापन करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

यासाठी गेले दीड दशक म्हणजे जवळजवळ १५ वर्षे वैज्ञानिक तयारी करत आहेत. २००४ सालीच रोजिरा यान अंतराळात पाठविले गेले आहे. ते ६ ऑगस्ट रोजी चिरयुमोव्ह धुमकेतूच्या जवळ ३० किमी अंतरावर पोहोचणार आहे. तेथेच ते धुमकेतूच्या कक्षेत स्थिर केले जाईल व नंतर प्रयोगशाळा धुमकेतूच्या पृष्ठभागावर स्थापन केली जाईल. यासाठी नोव्हेंबर महिना उजाडेल असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हा धुमकेतू पृथ्वीपासून ४० कोटी किमी दूर अंतरावर आहे. फिले प्रयोगशाळा अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज करण्यात आली आहे.यातून काय काय माहिती हाती लागेल याविषयी वैज्ञानिकांना मोठी उत्सुकता आहे.

Leave a Comment