दोनेस्क : युक्रेनचे पंतप्रधान अरसेनी यत्सेनयुक यांनी अल्पमतात आलेले सरकार टिकविण्यात अपयश आल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युक्रेनमध्ये त्यामुळे राजकीय अनिश्चिता निर्माण झाली आहे.
अरसेनी यत्सेनयुक यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा
युक्रेनच्या पूर्व प्रातांतील बंडखोरी मोडून काढण्याठी सुरू केलेल्या संघर्षामुळे पूर्व प्रांतात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील अनेक घटक पक्षांनी सोडचिठ्ठी दिल्याने आघाडी संपुष्टात आली. त्यामुळे राजीनामा दिल्याचे पंतप्रधान यत्सेनयुक यांनी सांगितले. राष्ट्रपतींच्या आदेशान्वये युक्रेनमध्ये येत्या 30 दिवसात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर हेणार आहेत.