अँडरसन वाद; जाडेजावर दंडात्मक कारवाई

jadeja
लंडन: भारताच्या रविंद्र जाडेजावर इंग्लंडच्या जेम्स अँडरसनसोबत झालेल्या वादाप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून जाडेजाला लेव्हल वन अंतर्गत दोषी धरण्यात आल्यामुळे जाडेजावर मॅच फीच्या 50 टक्के रक्कमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अँडरसन आणि जाडेजामध्ये नॉटिंगहम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहाराला पॅव्हेलियनमध्ये परतताना वाद झाला होता. यानंतर याप्रकरणी आयसीसीकडे भारतीय संघव्यवस्थापनाने तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर इंग्लंड संघव्यवस्थापनानेही जाडेजाची तक्रार केली. त्यामुळे त्याच्यावर लेव्हल टूच्या शिस्तभंगाचे आरोप ठेवण्यात आले होते. दरम्यान मॅच रेफ्री डेव्हिड बून यांनी जाडेजावर खेळ भावना दुखावल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली.

याप्रकरणाची अंतिम सुनावणी एक ऑगस्टला होणार आहे. अँडरसन या प्रकरणात दोषी आढळला तर त्याच्यावर दोन कसोटी किंवा 8 वन डे सामन्यांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment